Mumbai : भाजप नगरसेविकेच्या भावाचा पत्रकारावर हल्ला! चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Mumbai : भाजप नगरसेविकेच्या भावाचा पत्रकारावर हल्ला!

मीरा भाईंदर शहरातील एका मान्यवर दैनिकाचे प्रतिनिधी भाविक पाटील यांना भाजप नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मीरा भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील एका मान्यवर दैनिकाचे प्रतिनिधी भाविक पाटील यांना भाजप नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी काशीमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील नामवंत दैनिकाचे मीरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास वृत्तसंकलन करण्यासाठी पेनकर पाडा परिसरातून जात असताना पेनकर पाडा परिसरातील भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांचे भाऊ राजेश चौहान चारचाकी वाहन घेऊन भरधाव वेगाने जात होते.

हे देखील पहा :

त्यावेळी त्याच्या मागे पत्रकार भाविक पाटील मोटारसायकल वर होते. पत्रकार भाविक पाटील यांना गाडी मागे घे अश्या उर्मट भाषेत राजेश चौहान यांच्याकडून सांगण्यात आले. राग अनावर झाला आणि गाडीतून उतरून पत्रकार भाविक पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली यावेळी पत्रकार भाविक पाटील यांनी थांबण्याचा प्रयत्न केला असता धमकी दिली.

या संदर्भात शहरातील सर्व पत्रकार यांनी काशीमिरा पोलिस ठाण्यात धाव घेतली व संबंधित मारहाण करणारा मुजोर राजेश चौहान यांच्या पत्रकार संरक्षण कायदा, धमकी, शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीवर याअगोदर जमीन बळकावणे, अनधिकृत बांधकाम करणे, मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पत्रकार भाविक पाटील यांच्यावर झालेला हल्ला जाणीवपूर्वक केला असून अश्या मुजोर आणि सत्तेचा माज असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT