stray dog  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Mumbai Crime News : भांडुपमध्ये एका महिलेने भटक्या कुत्र्यांवर केमिकलचा स्प्रे मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Vishal Gangurde

मयुर राणे, साम टीव्ही

Mumbai Crime : मुंबईच्या भांडुपमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या भांडुपमधील एका इमारतीत भटक्या कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी एका महिलेने धक्कादायक प्रकार केला आहे. या महिलेने केमिकल स्प्रे मारून भटक्या कुत्र्याचा डोळा निकामी केल्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या भांडुपमध्ये इमारतीतील येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी त्यांच्यावर केमिकलचा स्प्रे मारल्याचा प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकाराविरोधात याच इमारतीत राहणाऱ्या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर घृणास्पद कृत्य करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भांडुपच्या गगनगिरी अपार्टमेंटमधील ही घटना आहे.

भांडुपमधील गगनगिरी इमारतीत रिटा नावाची महिला राणी नावाच्या श्वानाला नेहमी खाऊ घालायच्या. परंतु त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास व्हायचा. त्यामुळे या श्वानांना इमारतीतून पळवून लावण्यासाठी एका महिलेने चक्क त्यांच्या डोळ्यात केमिकलचा स्प्रे मारला. त्यानंतर काही दिवसांनी राणी या श्वानाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं रिटा यांना दिसून आलं.

रिटा यांनी या संदर्भात या श्वानावर उपचार करण्यासाठी रुग्णालय गाठलं. त्यावेळी त्यांना या श्वानाच्या डोळ्यात कुणीतरी केमिकलचा स्प्रे मारल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर रिटा यांनी त्यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर त्यांच्या शेजारी राहणारी महिलाच हे कृत्य करत असल्याचं निष्पन्न झालं. या संपूर्ण प्रकरणात राणी या श्वानाचा उजवा डोळा निकामी झाला आहे. या संदर्भात भांडुप पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भांडुप पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT