Mumbai Loyal City Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Honest City: मुंबईकर जगात भारी! 'मुंबई' ठरलं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर

Most Honest Cities: आपलं मुंबई शहर जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं प्रमाणिक शहर ठरलं आहे.

Vishal Gangurde

World's Second-Most Honest City Mumbai: आपलं मुंबई शहर जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं प्रमाणिक शहर ठरलं आहे. पाणपोईला ग्लास बांधून ठेवणारे, मंदिरात चप्पल सांभाळायचं भाडं भरणारे आणि बँकेत पेनला दोरीने बांधून ठेवणाऱ्या आपल्या माणसांमध्ये आजही प्रमाणिकपणा शिल्लक आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. (Latest Marathi News)

जगातल्या काही मोठमोठ्या शहरांमधील नागरिकांचा प्रमाणिकपणा पडताळण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक 'रीडर्स डायजेस्ट'ने एक भन्नाट सर्व्हे केला. ज्यात जगभारतून मुंबई दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर असल्याचं समोर आलं आहे.

रीडर्स डायजेस्ट या मासीकाने 16 शहरांमध्ये पैशाने भरलेले 192 पाकीटं सोडले. या सर्व्हेक्षणामध्ये प्रत्येक शहरामध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पैशांनी भरलेली १२ पाकिटे ठेवण्यात आले.

या पाकिटामध्ये एका व्यक्तीचे नाव,पत्ता, मोबाइल क्रमांक, कुटुंबाचे छायाचित्र, कूपन, व्यावसायिक कार्ड, स्थानिक चलनानुसार ५० डॉलर म्हणजेच ३ हजार ६०० रुपये ठेवण्यात आले. यानंतर कोणत्या शहरामधून किती पाकिटे परत आणून देण्यात येतात याची प्रतीक्षा करण्यात आली.

हेलसिंकीमधील नागरिकांनी पैसे असलेली ११ पाकिटे परत आणून दिली.. आणि जगातील सर्वात प्रामाणिक शहर होण्याचा बहुमान या शहराने पटकावला. त्यापोठापाठ आपल्या मुंबईकरांनी १२ पैकी नऊ पाकिटे परत आणून दिली. त्यामुळेच मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरलं आहे. मुंबईत वाढत्या गुन्हेगारीच्या आकडेवाऱ्या समोर येत असताना हा सर्वे दिलासा देणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

Black Raisin Benefits: हिवाळ्यात फक्त आठवडाभर खा भिजवलेले काळे मनुके, शरीरात दिसतील जबरदस्त बदल

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

SCROLL FOR NEXT