धक्कादायक! अल्पवयीन मुलाचे अपहरण करून विक्री करणारी टोळी गजाआड  सुरज सावंत
मुंबई/पुणे

धक्कादायक! अल्पवयीन मुलाचे अपहरण करून विक्री करणारी टोळी गजाआड

मुंबईत रस्त्यावरील अल्पवयीन मुलांचे (Mumbai Baby Kidnapping) अपहरण करून त्यांना विकणाऱ्या एका टोळीचा मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) पर्दाफाश केला आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईत रस्त्यावरील अल्पवयीन मुलांचे (Mumbai Baby Kidnapping) अपहरण करून त्यांना विकणाऱ्या एका टोळीचा मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीत एका महिलेचाही समावेश आहे. फरहाना कुर्बान शेख, परंदाम गुंडेती, नक्का राजु नरसिंहा, विशीरीकापल्या धर्माराव अशी या आरोपींची नावे आहेत. या टोळीने नुकतीच एका १० महिन्याच्या मुलाचे एस व्ही रोडहून मध्यरात्री अपहरण केले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींना शोधून काढत. अपहरण झालेल्या मुलाला त्याच्या आईकडे सुपूर्द केले.

वांद्रेच्या एसव्हीरोड परिसरात १ सप्टेंबरच्या मध्यरात्री एक महिला आपल्या १० वर्षाच्या मुलाला घेऊन झोपली होती. पीडित महिला झोपलेल्या ठिकाणाहून वाहतुक पोलिस चौकी अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने चौकीत कुणीच नव्हतं, याच संधीचा फायदा घेऊन फरहाना शेख हिने मुलाची आई गाड झोपत असताना. त्या मुलाचे अपहरण केले. ज्या वेळी मुलाच्या आईला बाळ पुढ्यात न दिसल्याने तिने शोधा शोध सुरू केली. मात्र मुलाची कोणतिही माहिती न मिळाल्याने पीडित महिलेने वांद्रे पलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.

मुलाच्या अपहरणाची माहिती मिळताच गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून निशांनदार यांनी मुलाच्या शोधासाठी विशष पथक नेमली. पोलिस चौकशीत कुरेशी नगरमध्ये एक महिला मुलाला घेऊन वारंवार काही वस्तू घेण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. त्यावेळी तिने गुन्ह्या़ची कबूली दिली. या महिलेने अपहरण केलल्या मुलाला अवघ्या दीड लाखांसाठी खारदांडा येथील तेलंगनाला रहात असलेल्या कुटुंबियांना विकले.

विकलेल्या मुलाचा व्यवहार परंदाम गुंडेती, नक्का राजु नरसिंहा, विशीरीकापल्या धर्माराव यांनी 3 लाख 15 हजारा़ना ठरवला होता. या आरोपींनी अशा प्रकारे अनेक मुलांचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे. या आरोपींना न्यायालयाने 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस त्या अनुशंगाने तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT