Mumbai Rain  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Rain : अवकाळी पाऊस पडला मुंबईच्या पथ्यावर; बिघडलेली हवा एका रात्रीत सुधारली!

Mumbai AQI Update : मुंबई काल पडलेल्या पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (AQI) ५० च्या खाली आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात एकही उपनगर नाही जिथे AQI १०० हून आधिक आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबईतील हवा मागील काही दिवसापासून चिंतेचा विषय बनला आहे. हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे (Air Pollution) हवेची गुणवत्ता मागील दोन महिन्यांपासून ढासळत चालली होती. मात्र काल रात्री पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. हवेची गुणवत्ता काल पडलेल्या पावसामुळे सुधारली आहे.

मुंबई काल पडलेल्या पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (AQI) ५० च्या खाली आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात एकही उपनगर नाही जिथे AQI १०० हून आधिक आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या आकडेवारीनुसार, हवेची गुणवत्ता बोरिवली येथे ३५, अंधेरी (पूर्व) ३९, ठाणे ३८, मुलुंड ४२ एवढी होती. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांत मुंबईतील हवेची गुणवत्ता ३०० वर पोहोचली होती. त्यामुळे मुंबईकरांचा चिंता वाढली होती. मात्र कालच्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज देखील पावसाची शक्यता

मुंबई पुढील १८-२४ तासांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. मात्र पाऊस पडला तर तो फार वेळ टीकणार नाही, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT