Andheri Gokhale Bridge Saam Tv
मुंबई/पुणे

Andheri Gokhale Bridge: अंधेरीतील नागरिकांसाठी खुशखबर! गोखले पूल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाहतुकीसाठी होणार खुला

Andheri News: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरीमधील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आता महापालिकेकडून नवा मुहूर्त देण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Andheri Gokhale Bridge:

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरीमधील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आता महापालिकेकडून नवा मुहूर्त देण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात गोखले फुल सामान्य नागरिकांना वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे अंधेरीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते. सध्या अंधेरी गोखले फुलाचे 90% पेक्षा अधिक काम झाले असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उर्वरित काम पूर्ण करून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या पुलाचे लोकार्पण केले जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची निर्मिती 1975 मध्ये करण्यात आली या पुलाचा वांद्रे दिशेकडील एक भाग 3 जुलै 2018 मध्ये कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर नागरिकांची सुरक्षा ध्यानात घेऊन नोव्हेंबर 2022 पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने या परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. अंधेरीसह सांताक्रुज ते जोगेश्वरी या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली. पालिकेने हा पुल संपूर्ण तोडून नव्याने दुरुस्ती करून नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. लोकार्पणासाठी आत्तापर्यंत महापालिकेकडून पाच मुहूर्त देण्यात आले होते मात्र ते पाचही मुहूर्त महापालिकेकडून पाळण्यात आले नाहीत. (Latest Marathi News)

आता दोन दिवसापूर्वी महापालिका आयुक्त इकबाल चहल सिंग आणि रेल्वे अधिकारी कंत्राटदार यांच्यासोबत जाऊन पूलाची पाहणी केली असता या पूलाच्या रेल्वे हद्दीतील भागावर गार्डन टाकून लोखंडी सळ्या टाकून काँक्रिटीकरणाचं काम देखील पूर्ण झाला आहे. आता पुलाचे कठडे उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 90% पेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांना कंत्राटदाराकडून देण्यात आला आहे.

महापालिकेकडून यापूर्वी देण्यात आलेले पाचही मुहूर्त चुकले असून आता पालिकेने फेब्रुवारी महिना अखेरीचा मुहूर्त दिला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या पुलाची एक मार्गीका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे या मार्गीकेवरून रिक्षा, टॅक्सी, दुचाकी सोबतच चार चाकी लहान वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे मात्र पूलाच्या दुसऱ्या मार्गीके चे काम अद्यापही बाकी आहे. या यामुळे त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या अवजड बॅरिगेटिंग आणि गर्डर होल्डर हटवता येणार नाहीत त्यामुळे या मार्गावरून सुरुवातीला अवजड वाहने किंवा बेस्ट बसेस चालवता येणार नाहीत असे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT