Andheri Fire : Saam tv
मुंबई/पुणे

Andheri Fire : मुंबईतील अंधेरीत इमारतीला भीषण आग, परिसरात धुराचे लोट

Mumbai Andheri Fire Latest News : मुंबईच्या अंधेरीत आगीची दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ मिलिटरी रोड भागातील इमारतीला ही आग लागली आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी ही आग लागली.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Andheri Fire :

मुंबईच्या अंधेरीत आगीची दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ मिलिटरी रोड भागातील इमारतीला ही आग लागली आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी ही आग लागली. या आगीनंतर इमारतीमधील लोकांमध्ये एकच भीती पसरली. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील रहिवाशी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अंधेरीतील मरोळ मिलिटरी रोड भागातील जगदीश अपार्टमेंट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली. य या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आग लागल्यानंतर इमारतीत अडकलेल्या नागरिकांची मुंबई अग्निशमन दलाचे जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. इमारतीला आग लागल्यामुळे धुराचे लोट उसळू लागले. त्यामुळे इमारतीत 40 पेक्षा अधिक नागरिक अडकले होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

आग लागलेल्या घरातील एक लहान मुलगा आणि महिला देखील होती. त्यांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. आता घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस दलाचे अधिकारी देखील उपस्थित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT