Mumbai Air Pollution Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Air Pollution: धुकं की धुरकं? मुंबईची हवा पुन्हा बिघडली; नागरिकांचं आरोग्य धोक्यात

Mumbai News: मुंबई शहर आणि उपनगरांमधील हवा पुन्हा बिघडलीये. तब्बल 13 ठिकाणच्या वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. वांद्रे, बोरिवली, अंधेरी, देवनार, कुर्ला, कुलाबा येथील हवा

Ruchika Jadhav

Air Pollution:

मुंबईमध्ये ऑक्टोबर महिन्यात हवेची गुणवत्ता फार घसरली होती. प्रदूषित हवा असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत होता. हीच हवा आता पुन्हा एकदा बिघडली आहे. कुलाबा, माझगाव, वरळी, बीकेसीसह १३ ठिकाणचा एक्यूआय २०० पार पोहचला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई शहर आणि उपनगरांमधील हवा पुन्हा बिघडलीये. तब्बल 13 ठिकाणच्या वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. वांद्रे, बोरिवली, अंधेरी, देवनार, कुर्ला, कुलाबा येथील हवा गुणवत्ता निर्देशांकाने (एक्यूआय) शुक्रवारी दोनशेची पातळी ओलांडली. नागरिकांच्या आरोग्याबाबत ही मोठी चिंतेची बाब आहे.

नेव्ही नगर, कुलाबा (293) येथे काल सर्वाधिक वायू प्रदूषण आढळून आले. त्यानंतर, माझगाव (283), सिद्धार्थ नगर, वरळी (281), बीकेसी (271), बीकेसीतील अमेरिकन वकिलाती कार्यालय (263), कुर्ला आणि देवनार (259) या ठिकाणच्या हवेचा स्तर आरोग्याला घातक प्रमाणात नोंदला गेला.

एक्यूआय दोनशेपार झालेल्या ठिकाणांमध्ये बोरिवली (244), मालाड (207), नेरूळ (238), वसई-पश्चिम (221) या ठिकाणांचा समावेश आहे.

AQI कसा मोजला जातो?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, 0-50 मधला AQI चांगला, 51 आणि 100 मधील समाधानकारक, 101 ते 200 मध्यम, 201 ते 300 दरम्यान खराब, 301 ते 400 अत्यंत खराब तर 400 पेक्षा जास्त गंभीर श्रेणीमध्ये मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT