aditya thackeray  saam tv
मुंबई/पुणे

आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना ब्रेक? महापालिकेने घेतला मोठा निर्णय

ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये बदल करण्यात येत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवाजी पार्क येथील महत्वाकांक्षी प्रकल्पात बदल करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदली झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये बदल करण्यात येत आहेत. (Aditya Thackeray News)

शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धूळीच्या प्रदुषणाला रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्क मैदानाचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. यात शिवाजी पार्कच्या नुतनीकरणावरही भर देण्यात आला होता.

मात्र, या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले, असतांना धूळीच्या प्रदुषणाची समस्या कमी न होता. अधिक वाढल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर आता शिवाजी पार्क प्रकल्पाच्या सध्याच्या कामात काही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. हे बदल करण्याकरता पुन्हा एकदा रहिवाशांकडून सुचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. (Aditya Thackeray Todays News)

त्याचबरोबर, प्रकल्पाकरिता असलेल्या कोअर कमिटीची व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पांमध्ये बदल होत असले तरी, प्रकल्पाला स्थगिती देण्याचा कुठलाही विचार नाही. रहिवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन काही बदल केले जातील. असं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT