Mumbai Accident News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident News: धक्कादायक! मुंबईत भरधाव डंपरने मुलीला चिरडले; अपघातानंतर चालकाने पळ काढला पण...

Mumbai Accident News in Marathi: मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातून अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीच्या मालपा डोंगरी परिसरातील पेपर बॉक्स कंपनीसमोरील रस्त्यावर भरधाव डंपरने मुलीला चिरडण्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Andheri Accident News:

मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातून अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीच्या मालपा डोंगरी परिसरातील पेपर बॉक्स कंपनीसमोरील रस्त्यावर भरधाव डंपरने मुलीला चिरडण्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरातील पेपर बॉक्स कंपनी समोरील रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पेपर बॉक्स कंपनीच्या रस्त्यावर अपघात झाला.

अपघात नेमका कसा झाला?

पेपर बॉक्स कंपनी समोरील रस्त्यावरून पायी चालणाऱ्या एका लहान मुलीला भरधाव वेगात आलेल्या डंपरने धडक दिली. या धडकेत मुलगी रस्त्यावर पडली. या अपघातात तिच्या हात आणि पायावरून डंपर गेल्याने गंभीर जखमी झाली आहे.

रस्त्यावरील नागरिकांनी त्या मुलीला डंपरच्या चाकाखालून काढून ताबडतोब मुंबईच्या जोगेश्वरी येथील ड्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, डंपर चालक पळून जात असतानाच नागरिकांनी त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चालकाला अटक करण्यात आली आहे.

नेपाळमधील पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. पुणे-नाशिक महामार्गावर पेठ जवळ ट्रकला बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेपाळी नागरिकांच्या प्रवाशांच्या बसचा पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर पेठ जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात अनेक जखमी झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT