Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईत इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; एका कामगाराचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळीमधील एका इमारतीच्या पार्किंगची लिफ्ट २३ व्या मजल्यावरून पडून दुर्घटना घडली आहे.

जयश्री मोरे

Mumbai News : मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळीच्या एका इमारतीच्या पार्किंगची लिप्ट २३ व्या मजल्यावरून कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेने इमारत परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून लिफ्टमध्ये अडकलेल्यांसाठी बचाव कार्य सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विक्रोळीच्या श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह इमारतीमध्ये पार्किंगची लिफ्ट २३ व्या मजल्यावरून कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

इमारतीच्या पार्किंगच्या २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले आहेत. घटनास्थळी अग्नीशमन दलाने बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी दोन कामगारांना बाहेर काढण्यात आलं. अद्यापही काही कामगार हे या लिफ्टमध्ये अडकलेले आहेत. 23 मजल्यांची ही इमारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी कायम

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

शेतकरी कर्जमाफीनंतर राज्य सरकारनं पशुपालक, कुक्कुटपालकांसाठी घेतला मोठा निर्णय,बळीराजाला आले 'अच्छे दिन'

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

SCROLL FOR NEXT