अजित दादा 'क्या हुआ तेरा वादा' saam tv
मुंबई/पुणे

अजित दादा 'क्या हुआ तेरा वादा'

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल? विद्यार्थ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे, अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

पुण्यातील स्वप्नील लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर सरकारला फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, राज्यभर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी Ajit pawar ३१ जुलै पर्यंत भरती प्रक्रिया राबविली जाईल असे आश्वासन दिले होते, मात्र मुदत उलटूनही आश्वासन पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे, त्याचबरोबर एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख combine exam date लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, अन्यथा क्रांतिदिनी आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी आज पुण्यामध्ये दिला.

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची परीक्षा लवकर घेण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी आजपासून सोशल मीडियावर ट्रेंड सुरू केला आहे, गेल्या दोन वर्षापासून आतापर्यंत तब्बल सहा वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यामुळे या सर्व परीक्षांसाठी एकच तारीख जाहीर करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत, काही महिन्यांपूर्वी mpsc ची परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडले होते, या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले, शेवटी या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली होती.

राज्यात कोरोनाची लाट ओसरू लागली आहे, राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे, काही प्रमाणात लसीकरण झाले आहे या पार्श्ववभूमीवर mpsc च्या विद्यार्थ्यांचा विचार करावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. ऑगस्ट महिन्यात शालेय शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती परीक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा UPSC , त्याबरोबर बँकिंग आदी प्रकारच्या प्रवेश परीक्षा नियोजित आहेत, अशावेळी mpsc च्या परीक्षेबाबत निर्णय झाल्याने mpsc चे उमेदवार हवालदिल झाले आहेत. संयुक्त परीक्षेची तारीख आणि रखडलेल्या नियुक्त्या याबाबत तातडीने निर्णय घेऊन सर्व उमेदवारांना दिलासा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Edited by: Ashwini jadhav kedari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT