MPSC EXAM Saam TV
मुंबई/पुणे

MPSC EXAM : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर CM शिंदेचं मोठं वक्तव्य; म्हणाले,'सरकारची भूमिका...'

यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ruchika Jadhav

PUNE News : काल सोमवारपासून पुण्यातील बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या निर्णयावर विद्यार्थी ठाम आहेत. अशात या विद्यार्थ्यांबरोबर काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील आमरण उपोषण करत आहेत. यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest MPSC News)

सलग दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ' मी स्वत: एमपीएससी प्रमुखांशी बोललो आणि समजावून सांगितल. MPSC चा जो अभ्यासक्रम आहे ऑब्जेक्टीव आणि डिस्क्रीप्टीव हे दोन्ही बदलण्यास आमची हरकत नाही. मात्र विद्यार्थ्यांचं म्हणणं आम्हाला मान्य आहे. जो बदल करायचा आहे तो साल २०२५ पासून करण्यात यावा. आम्ही यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. याआधीही आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम केली आणि आता देखील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली तसेचस मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत मोठं विधान केलं आहे. 'सरकारने या अगोदर विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर आश्वासन नको अंमलबजावणी हवी. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर काय निर्णय होणार याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

साल 2025 पासून नवा अभ्यासक्रम लागू करावा.

पॅटर्न लागू करण्यासाठी घाई करु नये.

अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 5 ते 6 महिन्यांचा वेळ मिळावा.

नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रवार आधारित असल्याने पुस्तकं उपलब्ध नाहीत. ती उपलब्ध करून द्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT