खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, पुण्यात उपचार सुरू Saam Tv
मुंबई/पुणे

खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, पुण्यात उपचार सुरू

पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - भाजपचे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना कोरोनाची Corona Postive लागण झाली आहे. उदयनराजे यांना दिल्लीहून Delhi परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील Pune रुबी हॉस्पिटलमध्ये Hospital सध्या उदयनराजे भोसले यांच्यावर उपचार सुरू असून यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

प्राप्त माहितीनुसार, चार दिवसांपूर्वीच उदयनराजे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आई राजमाता कल्पनाराजे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

आधी कल्पनाराजे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र, त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा एकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासदार उदयनराजे हे आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी चार दिवसांपूर्वी दिल्लीहून आल्यावर थेट रुग्णालयात दाखल झाले होते. दिल्लीहून आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते त्यामुळे त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT