MP Supriya Sule Test Covid Negative Saam Tv
मुंबई/पुणे

Supriya Sule: आम्ही पुन्हा कामाला लागू! खासदार सुप्रिया सुळे कोरोनामुक्त...

Supriya Sule: 29 डिसेंबरला त्यांना कोरानाची लागण झाली होती. त्यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची (Covid Positive) लागण झाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 29 डिसेंबरला त्यांना कोरानाची लागण झाली होती. त्यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची (Covid Positive) लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेटेड करुन घेतलं होतं. आता त्या कोरोनामुक्त (Covid Negative) झाल्या आहेत.

हे देखील पहा -

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी सर्वांना धन्यवाद देत सर्वांचे आभार मानले. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विट केलं की, "7 दिवस पूर्ण विश्रांती आणि होम आयसोलेशन नंतर, आम्हा सर्व 4 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून आम्ही रविवारपर्यंत समान प्रोटोकॉलचे पालन करत राहू. सोमवारपासून आम्ही पुन्हा काम सुरू करू. तुमच्या सर्व समर्थनाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद." अशा शब्दांत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संसदेतील नंबर 1 खासदार

दरम्यान २०२१ मधील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुप्रिया सुळे ह्या सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या होत्या. पीआरएस संस्थेनं केलेल्या सर्व्हेनुसार, लोकसभा अधिवेशनामध्ये खासदार किती वेळा उपस्थितीत राहिले? किती प्रश्न विचारले? चर्चेंमध्ये सहभाग खासगी विधेयके आदींचा या अहवालात उल्लेख करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत (Loksabha) सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले तसेच अनेक चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या, त्यामुळे त्या अव्वल ठरल्या.

17 व्या लोकसभेत सुप्रिया सुळे 91 टक्के उपस्थित होत्या. तर १५९ चर्चासत्रात त्या सहभागी झाल्या होत्या. याशिवाय सुमारे ३८३ प्रश्न त्यांनी विचारले आणि 7 खाजगी विधेयकं त्यांनी मांडली. त्यांच्या या प्रशस्त कामगिरीमुळे त्या लोकसभेत अव्वल ठरल्या. आता कोरोनातून बरे झाल्यानंतर त्या कामं करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहेत. (After 7 days of complete rest and home isolation,all 4 of us have tested negative Said Supriya Sule)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies Of Dark Circle: ना क्रिम, ना पार्लर; या घरगुती उपायांनी घालवा डोळ्याखालील डार्क सर्कल

'सर्वांना वाटतंय तू Virgin नाहीस', 50 विद्यार्थिनींना Whatsapp वर मेसेज, अश्लील चॅट व्हायरल, ३ प्रोफेसर निलंबित

Local Body Election : रवींद्र चव्हाणांनी पुन्हा डाव साधला, शिंदेंचे ठाण्यातील २ शिलेदार फोडले, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Satbara : सातबारा आता फक्त १५ रूपयात, तलाठ्याच्या सहीची गरज नाही

SCROLL FOR NEXT