Supriya Sule Saam Tv
मुंबई/पुणे

NCP'च्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवर अजित पवार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया

पुण्यातील मारहाणीचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्यात भाजपच्या (BJP) एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रीया येत आहेत. आता या मारहाणीचा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निषेध व्यक्त केला आहे.

पुण्यातील महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या घटनेचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार- अजित पवार

सर्वच पक्ष आंदोलन करतात. आमच्या विरोधात देखिल भाजप कार्यकर्ते आंदोलन करतात. केंद्रीय मंत्र्यांविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करतात. आंदोलन हा राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. ते सगळे पक्ष करतात. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आंदोलनात कायदा हातात कोणी घेऊ नये. केंद्रीय मंत्र्यांना संरक्षण देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. ते काम पोलीस करत आहेत, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

कारवाई करणार - रुपाली चाकणकर

महिलेला अशा पध्तीने मारहाण करणं चुकीचे आहे. आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे, अशी प्रतिक्रीया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

मारहाण केली तो गिरीष बापट यांचा कार्यकर्ता : रुपाली ठोंबरे पाटील

ज्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. ज्याने मारहाण केली तो गिरीष बापट यांचा कार्यकर्ता आहे. तुम्हाला भाजपची वृत्ती आता कळाली असेल. भाजपचा मुखवटा आम्ही फाडला आहे. भाजप सुसंस्कृत नाही. केंद्राची सत्ता आहे म्हणून त्यांना मस्ती आली आहे, असंही रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात NCP महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण

पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रसेने (NCP) आंदोलन केलं.

बालगंधर्व येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इराणी आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या सभागृहात अचानक गोंधळ झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजपच्या (BJP) कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT