Thackeray vs Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : निवडणुका लागू तर द्या, आम्ही सुद्धा... ठाकरेंच्या 'त्या' आव्हानाला शिंदेंचं उत्तर

हिम्मत असेल तर पालिका, विधानसभा किंवा लोकसभा कुठल्याही निवडणुका लावून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं होतं

Satish Daud

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Thackeray vs Shinde : हिम्मत असेल तर पालिका, विधानसभा किंवा लोकसभा कुठल्याही निवडणुका लावून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं होतं. या आव्हानाला शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. निवडणुका लागणारचं आहेत. आम्ही सुद्धा तयार आहोत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. (Maharashtra Political News)

रविवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेकडील ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट आणि डोंबिवली पश्चिमेकडील पहिले वातानुकूलित अभ्यासिकचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आव्हानाला उत्तर देताना श्रीकांत शिंदे म्हणाले. निवडणुका घेवून दाखवा म्हणजे काय ? देशात महाराष्ट्रात इलेक्शन कमिशन आहे की नाही? अभ्यास केला असेल तर कोर्टात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना हे विषय प्रलंबित आहेत त्याच्या तारखा आहे. असे सगळे असताना निवडणूका घ्या असं बोलता आहात. निवडणुका लागू तर द्या. आम्ही पण तयारच आहोत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

मुंबईत रविवारी ठाकरे गटाचा उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला. यावेळी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलं. 'विधानसभा, लोकसभा, महापालिका यापैकी कोणत्याही निवडणुका घ्या आम्ही तयार आहोत'', असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं. (Latest Marathi News)

आजच्या पंतप्रधानांना त्यावेळी बाळासाहेबांनी वाचवलं, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आज जे पंतप्रधान आहेत त्यांना ऐकेकाळी बाळासाहेबांनीच वाचवलं होतं. आम्ही २५ वर्ष भाजपबरोबर राजकीय मैत्री केली पण आम्हाला काय मिळालं?'', असा सवालही यावेळी त्यांनी केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT