दिव्यातील विकास कामांचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला आढावा  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

दिव्यातील विकास कामांचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला आढावा

खा.डॉ.श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के यांचा आज दिवा शहरात पाहणी दौरा होता. यावेळी त्यांनी शहरातील चालू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. तसेच इतर विकास कामे आणि आरक्षित जागेची पाहणी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदीप भणगे

दिवा : खा.डॉ.श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के यांचा आज दिवा शहरात पाहणी दौरा होता. यावेळी त्यांनी शहरातील चालू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. तसेच इतर विकास कामे आणि आरक्षित जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि रखडलेल्या रस्त्यांच्या कामावरून अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. MP Shrikant Shinde reviewed the development work in Diva

हे देखील पहा -

गेल्या काही वर्षांपासून दिवा शहरात रस्त्याची कामे चालू आहेत. मात्र ही कामे संथ गतीने चालू आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. यासाठी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे पदाधिकारी यांनी देखील ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांनी दिवा शहरात दौरा ठेवून पाहणी करावी अशी मागणी केली.

दुसरीकडे दिवा-आगासन या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकराणचे काम पण चालू आहे, याची पाहणी आणि दिव्यातील इतर ठिकाणच्या रस्त्याच्या कामाची पाहणी आज खा.डॉ.श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के यांनी केली. यावेळी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खा.डॉ.शिंदे यांनी फैलावर घेतले आणि रखडलेल्या रस्त्यांच्या कामावरून अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

तसेच दिवा-आगासन या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकराणाच्या कामात ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नसेल कारवाई करा असे आदेश दिले.यावेळी महापौर नरेश म्हस्के, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेविका अर्चना चरण म्हात्रे आणि इतर नगरसेवक उपस्थित होते. 

नगरसेवक रमाकांत मढवी यांनी कोणकोणती कामे महापालिका करत आहे आणि त्याची परिस्थिती काय आहे याची माहिती महापौर आणि खासदार यांना दिली.तर भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी दिवा-आगासन रस्त्याचे काम ठेकेदार योग्यरित्या करत नसल्याचे खा.शिंदे यांना सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT