Shrikant Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Shrikant Shinde : उद्धव ठाकरेंना जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल? श्रीकांत शिंदेंची टीका

Shrikant Shinde on uddhav thackeray : जम्मू कश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही, असे विधान ओमर अब्दुल्ला यांनी केलं होतं. या विधानावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

Vishal Gangurde

अभिषेक देशमुख, कल्याण

Shrikant Shinde News :

जम्मू कश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही, असे विधान ओमर अब्दुल्ला यांनी केलं होतं. या विधानावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. 'ओमर अब्दुल्ला यांना यावरून जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल? असा सवाल करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. (Latest Marathi News)

श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला. याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र,ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही, असं वक्तव्य केलं. ओमर अब्दुल्ला यांचा महाराष्ट्र राज्यभर निषेध सुरू आहे. मी देखील तीव्र शब्दात निषेध करतोय'.

'प्रत्यक्षात काश्मीरला सगळ्यात जास्त पर्यटक महाराष्ट्रातून जातात. टुरिझमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून काश्मीरला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळते. मराठी माणसाच्या नावावर राजकारण केलं, त्यांनी ओमर अब्दुल्ला यांना विचारण्याची हिंमत ठेवावी, असे ते म्हणाले.

'जे राहुल गांधी कायम सावरकरांबद्दल नकारात्मक बोलतात. त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचं काम करत आहेत. तसेच त्यांचे स्वागत करण्याचं काम हे करतात. ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगार प्रत्येकाचा मनात फुलवण्याचं काम केलं. या घटनेवरून ओमर अब्दुल्ला यांना जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिंदेंनीच ठाकरेंना पक्षातून काढलं; सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT