Sanjay Raut saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यावर....'; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीकास्त्र सोडलं.

जयश्री मोरे

Sanjay Raut News : आज विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना स्मरण करत बाळासाहेबांच्याही स्मृतींना उजाळा दिला. यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीकास्त्र सोडलं. 'आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली की, यांच्या तोंडाला फेस येतो' अशी टीका राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. (Latest Marathi News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला. संजय राऊत म्हणाले, 'स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट होते. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा. आम्ही मागणी केली की यांच्या तोंडाला फेस येतो'.

'देशात क्रांतीची मशाल पेटवणारे महान क्रांतिकारक सावरकर हे बाळासाहेब ठाकरेंचे प्रेरणास्थान होते. वीर सावरकर यांचा देशात वारंवार अपमान करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करावं, असेही राऊत पुढे म्हणाले.

पुण्यातील (Pune) पोटनिवडणुकीच्या मतदानावर भाष्य करताना म्हणाले, 'पुण्यात मतदानाची टक्केवारी आता जरी कमी असली तरी नंतर वाढणार आहे. आज रविवार असून पुणेकर उतरले की रांगा लागणार. पुणेकरांचा प्रचारात मोठा प्रतिसाद होता. 5 ते 6 मंत्री प्रत्येक मतदारसंघात आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर केला जातोय. परभवाची भीती असली की दबावतंत्र वापर केला जातो'.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीवर राऊत यांनी भाष्य केलं. 'शिंदे गटानं कार्यकारिणीत ठराव केलाय की मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा. आता केंद्रातील त्यांच्या महाशक्ती सरकारने, दर्जा द्यावा.बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच मराठी अस्मितेसाठी केली. 5 ते 6 वर्षांपासून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण सुरु आहे हे दुर्दैव, असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT