खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ? ED कडून दुसरं समन्स Saam Tv
मुंबई/पुणे

खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ? ED कडून दुसरं समन्स

शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांना परत एकदा ईडीने समन्स बजावले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे खासदार भावना गवळी Shivsena MP Bhavana Gawali यांना परत एकदा ईडीने समन्स ED Probe Bhavana Gawali बजावले आहेत. येत्या २० ऑक्टोबर दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनी लाँडरींगच्या आरोपाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे भावना गवळींच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम या ठिकाणी मोर्चा काढला होता. यानंतर गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टल दिवशी ईडीनेकडून छापेमारी करण्यात आली होती. जवळपास ९ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खानला देखील अटक करण्यात आली होती.

यामुळे गवळींच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यांना ४ ऑक्टोबर दिवशी ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीने त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपत असून, भावना गवळींना दुसऱ्यांदा ईडीने समन्स जारी करण्यात आली आहे. येत्या २० ऑक्टोबर दिवशी त्यांना चौकशीकरिता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार यावेळी देखील खासदार भावना गवळी चौकशीसाठी उपस्थित राहतात की नाही हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad Tourism : धबधबे, धुके अन् डोंगररांगा; हिवाळ्यातील नंदनवन, 'येथे' ट्रेकिंग करताना मिळेल अविस्मरणीय अनुभव

Mardaani 3 : 'मर्दानी 3'साठी राणी मुखर्जीने घेतलं तगडं मानधन, 'या' अभिनेत्रीला मिळाली सर्वात कमी फी

Maharashtra Live News Update: २५ लाखासाठी उमेदवार विकले गेले, महामार्गावर लागले बॅनर

पुणे हादरलं! आईनं २ लेकरांसह मृत्यूला कवटाळलं, नवऱ्याच्या त्या कृत्यानं माऊलीने उचलले टोकाचं पाऊल

Stomach acidity symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा पोटातील पित्त वाढतंय; अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी गॅस्ट्रो तज्ज्ञांचा सल्ला

SCROLL FOR NEXT