शिवसेना UPAमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना UPAमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली...(पहा व्हिडिओ)

२०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या ५ राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra ) महाविकास आघाडीच्या (MVA) प्रयोगाद्वारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करण्यात आली आहे. शिवसेना याकरिता २०१९ मध्ये एनडीएमधून (NDA) बाहेर पडली. २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या ५ राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यूपीएमध्ये (UPA) सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहा व्हिडिओ-

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या ५ राज्यांच्या निवडणुकाविषयी शिवसेना निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची माहिती आहे. संजय राऊत, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटणार आहेत. संजय राऊत उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर. बुधवारी प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी यूपीएवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. ममता बॅनर्जींनी यूपीए आणि काँग्रेस संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला सत्तेतून घालवायच असल्याचे काँग्रेसची भूमिका महत्त्वाची नमूद केले होते. यानिमित्ताने शिवसेना आणि काँग्रेस मधील जवळीक दिसून आली होती. आता शिवसेना खासदार संजय राऊत आज राहुल गांधी आणि उद्या प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्याने शिवसेना यूपीएमध्ये मध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड तालुक्यात पाऊस बरसला

Paneer Butter Masala Recipe: ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला घरी कसा बनवायचा? रेसिपी आहे अत्यंत सोपी

Phaltan Doctor Case: हातावरील सुसाईड नोट दुसऱ्यानेच लिहिली, महिला डॉक्टरच्या बहिणीचा दावा; फलटण बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट

Satara Crime : 'दादा' म्हणायची, त्याला प्रपोजही केलं, महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात आरोपी बनकरच्या बहिणीचा धक्कादायक दावा

Manikpunj Fort History: नाशिकला जायचा विचार करताय? मग जाणून घ्या माणिकपुंज किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT