उल्हासनगर मध्ये मोटार सायकल चोर अटक, तीन मोटारसायकल जप्त अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगर मध्ये मोटार सायकल चोर अटक, तीन मोटारसायकल जप्त

उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई

अजय दुधाणे

उल्हासनगर - पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या असल्याने उल्हासनगर पोलिसांनी याबाबत गुप्तबातमीदारांना जागृत केलं होतं. यावेळी एका गुप्त बातमीदाराने उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिलेल्या एका माहिती वरून, उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक परिसरात रात्री तीन वाजता सापळा लावून मोनू जयस्वार या युवकास मोटारसायकल सह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

हे देखील पहा -

या कामात त्याला त्याचा मित्र अमीन रुस्तम मन्सूरी हा सहकार्य करत असल्याची माहिती मनूने पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी अमीनला देखील अटक केली. या दोन्ही चोरांकडून तीन मोटारसायकल दोन एक्टिव्हा आणि एक पल्सर गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT