Video : सोन्याचा वडापाव ऐकलाय का? किंमत वाचून चक्रावून जाल Saam Tv
मुंबई/पुणे

Video : सोन्याचा वडापाव ऐकलाय का? किंमत वाचून चक्रावून जाल

मुंबईचा वडापाव जगभर सुप्रसिद्ध आहे. फक्त मुंबईतच नव्हे, तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईचा Mumbai वडापाव Vadapav जगभर सुप्रसिद्ध आहे. फक्त मुंबईतच नव्हे तर, देशाबाहेर देखील वडापाव आवडीने खाल्ला जातो. नुकतेच वडापाव विषयी एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे.

सामान्यपणे मुंबई मध्ये कुणालाही १० ते २० रूपयामध्ये वडापाव मिळत आहे. इतकेच नाही तर, चांगल्या दुकानांमध्ये जाऊ वडापाव ऑर्डर केला तर त्याचे मूल्य १०० रूपयाच्या आत असणार आहे. पण तुम्ही कधी २००० रूपये किंमतीचा वडापाव खाल्लायं का?

हे देखील पहा-

तर दुबईमध्ये Dubai २ हजाराचा मिळत आहे वडापाव. आता इतकी किंमत आहे म्हटल्यावर यात असे काय आहे की, याची किंमत इतकी जास्त आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला असणार आहे. चला तर मग कारण जाणून घेऊया. दुबई मधील एका दुकानात वडापावची किंमत १०० UAE म्हणजे जवळपास २ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. पण यामध्ये इतके काय खास आहे की, हा वडापाव २ हजारांचा आहे?

मुंबईचे सर्वात आवडतं स्नॅक्स Snacks हा वडापाव आहे. जगामधील पहिला २२ कॅरेटचा गोल्ड प्लेटेड वडापाव आहे. ज्याला ट्रफल बटर Truffle Butter आणि चीजपासून Cheese बनवण्यात आले आहे. इतकेच नाही तर, तोंडात पाणी आणणाऱ्या या वडापाववर २२ कॅरेट सोन्याचा अर्क लावण्यात आला आहे. ज्यामुळे या वडापावची किंमत इतकी जास्त प्रमाणात आहे. मशरत दाउदने ट्विटरवर Twitter एक व्हिडीओ Video शेअर केला आहे. ज्यात १३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT