morcha in dheu road
morcha in dheu road saam tv
मुंबई/पुणे

महात्मा फुले भाजी मंडई स्थलांतरित करू नका; पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी

दिलीप कांबळे

मावळ : मावळ (maval) येथील देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या नागरी समस्यांमध्ये सन २०१५ नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या बोर्डात आलेल्या भाजपाच्या (bjp) सत्तेमुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या नागरिकांच्या समस्यांकडे शासनाचे (maharashtra government) लक्ष वेधण्यासाठी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड (dehuroad cantonment board) कार्यालया समोर पिपल्स रिपब्लिकन पार्टी (देहूरोड) यांच्या वतीने आज जन आंदोलन छेडण्यात आले. (maval latest marathi news)

यावेळी आंदाेलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. पवित्र रमजानचे उपवास असूनही नागरी समस्यासांठी मुस्लिम समाजातील महिला आणि पुरुष देखील आंदाेलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. जो पर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत कॅन्टोमेंट बोर्डाच्या आवारातून बाहेर पडणार नसल्याचा निर्धार या वेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

यावेळी गौसिया शेख, सिराज शेख, जमीला शेख यांच्यासह आंदाेलन म्हणाले पाणीपट्टीचे दर अवास्तव वाढविले आहेत. घरपट्टी तीन पट्टीने वाढविली आहे. मंगल कार्यालयाचे भाडेवाढ स्थगित करावी तसेच महात्मा फुले (mahatma phule) भाजी मार्केट स्थलांतरित करू नये अशा आमच्या मागण्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreya Bugde: श्रेया बुगडेची पतीसोबत जम्मू काश्मीर स्वारी, Photos पाहा

Worli Hit And Run Case: अडीच वर्ष काय घडलं सांगू का? आता राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता इशारा

Hingoli News : हिंगोलीत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडलं; तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने शेतकरी आक्रमक

Electric Shock Safety: पावसात विजेचा झटका लागू नये यासाठी काय करावे? विद्युत सुरक्षेसाठी वीज कंपन्याचा काय आहे सल्ला?

Shiv Stuti : महादेवाच्या अराधनेने दूर होईल आर्थिक संकट; आजपासून पूजेमध्ये करा हे बदल

SCROLL FOR NEXT