पिंपरी-चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली  गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवड मधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात करण्यात येत आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी पात्रता पाण्याची पातळी वाढली असून चिंचवडचे ग्रामदैवत असणाऱ्या मोरया गोसावी गणपती मंदिर जलमय झाले आहे.

हे देखील पहा -

सध्या पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पवना धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे दोन वर्षानंतर पवना माई मोरया गणपती मंदिराला भेटायला आली नव्हती, मात्र या वर्षी पहिलाच पाऊस धमदार पडल्याने पवना माई मोरया गणपती मंदिरास भेटायला आली, हा एक शुभ संकेत असल्याचे मत मंदिरातील पूजाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचा प्रयत्न

Ration Card: कामाची बातमी! ७० लाख रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता; १ एप्रिलपासून नियम बदलणार

भाजप आमदाराच्या मुलाचा टोल नाक्यावर राडा, पैसे मागितले म्हणून कर्मचाऱ्याला मारले, घटना CCTV मध्ये कैद

Rashmika-Vijay Wedding : लगीन घटिका समीप आली! रश्मिका-विजय आज अडकणार लग्नबंधनात; पाहा शाही लग्नाचा मुहूर्त कधीचा?

Maharashtra Politics: विरारमध्ये भाजपला खिंडार, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह बविआमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT