ajit pawar  saam tv
मुंबई/पुणे

Video: सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या; अजित पवारांचा टोला

५० खाेके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे - अजित पवार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरल्यानंतर आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरूवातच वादळी झाली आहे. गेली चार दिवस विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली.

मात्र आज शिंदे गटातील आमदारांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.यादरम्यान, विधान भवन परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व जनता पाहत आहे, १७ तारखेपासून अधिवेशन सुरू आहे. आजपर्यंत आम्ही पायऱ्यांवर विरोधात घोषणाबाजी केली. त्या घोषणा आज सत्ताधाऱ्यांन झोंबल्या आहेत. आमच्या मागणीकडे लक्ष न देता. ५० खाेके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. या वादात आमदार अमोर मिटकरी (Amol Mitkari) यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT