Rishikesh Deshmukh  saam tv
मुंबई/पुणे

Money Laundering Case : अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

सूरज सावंत

Money Laundering Case News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. १०० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. ऋषिकेश देशमुख यांचा मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. (Latest Marathi News)

ऋषिकेशला जामीन मंजूर झाल्यास त्याच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती ईडीने न्यायालयाकडे केली होती. मात्र, आज, सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाकडून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

१०० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. कलम ८८ सीआरपीसी अंतर्गत जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ऋषिकेश देशमुख यांना तीन लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी वसूलीचे आदेश दिले होते. या आरोपांची सीबीआय आणि ईडी तपास करत आहे. या प्रकरणात ऋषिकेश देशमुख देखील सक्रिय असल्याचा आरोप आहे. अनिल देशमुख सध्या या प्रकरणात तुरुंगात आहेत.

अनिल देशमुख यांना या प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांना त्यानंतरही तुंरुगात रहावं लागत आहे. कारण ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, ६० दिवसात दिला निकाल

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

Maternal death: धक्कादायक घटना! इंटरनेटवरील व्हिडिओ पाहून पत्नीची घरातच प्रसूती करण्याचा प्रयत्न, तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ट्रेडिशनल टू मॉडर्न, मंगळसूत्राचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न, वटपौर्णिमेनिमित्त खरेदी करा

Eetha controversy: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर विठाबाईंच्या कुटुंबीयांची नाराजी; नाव बदला, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT