Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: रक्षकच बनला भक्षक! IPS अधिकार्‍याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल; पोलीस दलात खळबळ

आयपीएस अधिकार्‍यावर गुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Shivani Tichkule

सचिन जाधव

Crime In Pune: घरकाम करणार्‍या विधवा महिलेशी सोशल साइटच्या माध्यमातून ओळख वाढवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील एसआयडीत नियुक्त असलेल्या एका आयपीएस अधिकार्‍याविरोधात पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीएस निलेश अष्टेकर असा गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.(Latest Marathi News)

या महिलेच्या भाच्याला पोलीस (Police) दलात भरती करण्याचे आश्वासन देऊन अष्टेकर यांनी गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच महिलेला अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. आयपीएस अधिकार्‍यावर (IPS Officer) गुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

निलेश अष्टेकरविरोधात विनयभंग व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश अष्टेकर हा आयपीएस अधिकारी आहे. तो सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पुणे कार्यालयात नियुक्त आहे. तक्रारदार महिला कळवा (ठाणे) येथे राहते. ती घरकाम करते. (Pune News)

तिचे फेसबुकवर अकाउंट असून, या दोघांची त्याद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर फेसबुकवरून त्यांच्यात चॅटिंग व व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही बोलणे सुरू झाले. यानंतर त्याने महिलेला अश्लील मेसेज तसेच व्हिडीओ देखील पाठविले आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. यावरून आता भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT