'हम भी झुकेंगे नही ! राऊत आणि स्मग्लर लोकांचे संबंध, ग्रँड हयातमधील Mobile रेकॉर्डिंग समोर आणणार' Saam TV
मुंबई/पुणे

'हम भी झुकेंगे नही ! राऊत आणि स्मग्लर लोकांचे संबंध, ग्रँड हयातमधील Mobile रेकॉर्डिंग समोर आणणार'

'संजय राऊत यांनी कॅशमध्ये किती पैसे घेतले गोल्ड स्मग्लरसोबत तुमचे काय संबंध आहेत? कोविड सेंटरमधील पार्टनरसोबत राऊतांचे काय संबंध आहेत?'

सुरज सावंत

मुंबई : संजय राऊतांनी (Sanjay Raut) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरती मोठे आरोप केले आहेत. मोहित कंबोज यांनी पत्राचाळ जमीन व्यवहारात घोटाळा केला असून हा माणूसच फडणवीसांचा मर्जीतील 'फ्रँटमॅन' आहे आणि हा व्यक्तीच फडणवीसांना बुडवणार आहे. शिवाय कंबोज यांनी केलेल्या घोटाळ्यातील व्यवहारासाठी PMC बँकेच्या घोटाळ्यातील पैसा वापरला असल्याचा गंभीर आरोप देखील राऊत यांनी केला होता. आणि या सर्व आरोपांवरती बोलण्यासाठीच मोहित कंबोज यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी राऊतांवरती अनेक गंभीर आरोप केले.

ते म्हणाले, 'मिया नवाब यांनी आरोप केले आणि त्याला जावेद पुढे नेत आहेत. ट्विटर आणि अनेक माध्यमातून मला धमकी दिली. सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणे नवाब मलिक यांना कोर्टात मार पडला आहे. राऊत साहेब म्हणाले मी मोहित कंबोजला ओळखत नाही. राऊत साहेब दरवर्षी माझ्या घरी गणपतीला येतात असं कंबोज म्हणाले.

दरम्यान, 'माझ्या व्यवसायाची काय चौकशी करायची ती करा हे माझं आव्हान आहे. 175 एकर लँड खरेदी केली. 5 हजार करोडचा हा व्यवहार आहे. प्रवीण राऊतला 700 कोटी मिळाले, यात संजय राऊत यांना किती कट मिळाला. स्मग्लर लोकांसोबत संजय राऊत यांचा काय संबंध आहेत यात संजय राऊत यांचा किती कट आहे. असे उलट प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले, तसंच संजय राऊत यांनी कॅशमध्ये किती पैसे घेतले गोल्ड स्मग्लरसोबत तुमचे काय संबंध आहेत? कोविड सेंटरमधील पार्टनरसोबत राऊतांचे काय संबंध आहेत? असे सवाल त्यांनी राऊतांना विचारले.

हे देखील पहा -

हम भी झुकेगे नही -

दरम्यान आपण संजय राऊत याना लीगल नोटीस पाठवणार आहे. ज्या पद्धतीने नवाब मलिक (Nawab Malik) यांना तोडावर आपटावे लागले तेच संजय राऊत यांच्यासोबत झाले आहे. सलिम जावेदची जोडी आता देशभरात एक्सप्लोअर झाली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आणि शेवटी हम भी झुकेगे नही, ग्रँड हयात हॉटेल (Grand Hyatt Hotel) मधील सर्व रेकॉर्डिग मी समोर आणणार असल्याचा इशाराही कंबोज यांनी यावळी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT