नवाब मलिक यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांचे उत्तर Saam Tv
मुंबई/पुणे

नवाब मलिक यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांचे उत्तर

आर्यन खान प्रकरणी एनसीबीच्या कारवाईवर आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून अनेक आरोप करण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आर्यन खान प्रकरणी एनसीबीच्या कारवाईवर आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. आता नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या मोहित कंबोज यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. कंबोज यांच्या भाच्याच्या मदतीने आर्यनचे अपहरण करण्यात आले आणि खंडणी मागितली असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

हे देखील पहा-

यावर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. तसेच नवाब मलिक यांच्याविरोधामध्ये न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे. सुनिल पाटील आणि सॅम डिसूझाचे काय संबंध हे त्यांनी सांगावे, मलिक सत्य लपवत असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी यावेळी केला आहे. सुनिल पाटीलशी राष्ट्रवादीशी काय संबंध हे त्यांनी सांगावे.

आरोप करणाऱ्या मलिकांविरोधात मी हायकोर्टात खटला दाखल करणार असे देखील कंबोज यांनी सांगितले आहे. मलिक यांच्या आरोपांचे स्वागत, त्यांनी सिद्ध करून, दाखवावे मी त्यांच्या आरोपांचे स्वागत करतो. त्यांनी जे खोटे आरोप माझ्यावर केले आहेत. त्याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे. त्यांच्याच भाषेत उत्तर देईन, असा इशारा कंबोज यांनी यावेळी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 2027 चा वर्ल्डकप भारतासाठी शेवटचा, रोहितनेही सांगितला प्लान

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

SCROLL FOR NEXT