Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

Narendra Modi: मोदींनी पंतप्रधानपद सोडावं आणि सिनेमे बघावे; नाना पटोलेंच वक्तव्य

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) सारखे चित्रपट बनावेत, तसंच आजपर्यंत काश्मीरबाबतच सत्य लपवलं गेलं.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मोदींना (Narendra Modi) सिनेमा बघायला वेळ आहे. मोदी यांनी सिनेमा बघत राहावे पंतप्रधान पद सोडावे असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत असताना केलं. 2014 पासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने शेतकरी बिल माफ केले सांगत फसविले असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, आम्हाला जनतेचा काँग्रेस (Congress) पक्ष पाहिजे, घराणेशाहीचा नको असं वक्तव्य करत कपील सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे, यावरुनच पटोलेंना प्रश्न विचारला असता ते मात्र याबाबत मला काही बोलायचे नाही म्हणाले. कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी त्याचे वैयक्तिक मत मांडले असावे. समूहात सगळ्यांना सोबत घेऊन चालावे लागते असही ते म्हणाले.

हे देखील पहा -

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ परिवाराचे आहेत, एकीकडे टीका करायची आणि संघ चालवायचा असा प्रयत्न मोदी करत आहेत अशी टीका पटोलेंनी केली. शिवाय मोदींना आज सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो असा प्रश्न उपस्थित करत चित्रपटाचा कोणी विरोध केलेला नाही मात्र, शेतकरी आंदोलन करत असतांना मोदींचे लक्ष नव्हते, मोदींना सिनेमा बघायला वेळ आहे. मोदी यांनी सिनेमा बघत राहावे पंतप्रधान पद सोडावे असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदींनी 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) सारखे चित्रपट बनावेत, तसंच आजपर्यंत काश्मीरबाबतच सत्य लपवलं गेलं असल्याचं' वक्तव्य असं वक्तव्य केलं होत आणि त्यांच्या य़ाच वक्तव्यावरुन पटोलेंनी टोला लगावला.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होईल -

फडणवीस सरकारचे मनोरंजन करत आहेत. आतंकवादी बॉम्ब टाकतात फडणवीस कधी बॉंम्ब टाकायला लागले माहीत नाही. अध्यक्ष पदाच्या निवडणुक बाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आज उद्या सुप्रीम कोर्टात काय होते हे पहिले जाईल. आणि मग राज्यपालांची भेट मागीतली जाईल.पण या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूकlection of Assembly Speaker) होईल असही त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT