Narendra Modi/Pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune : सुरक्षा प्रोटोकॉल तोडून मोदींनी साधला पुण्यातील नगरसेवकांशी संवाद, म्हणाले...

नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण केल्यानंतर आपल्या सुरक्षेचा प्रोटोकॉल तोडून उपस्थित नगरसेवकांशी त्यांनी संवाद साधला.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यामध्ये आले आहेत यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.

मात्र यासर्व कार्यक्रमादरम्यान मोदींनी आपल्या सुरक्षेचा प्रोटोकॉल (Security Protocol) तोडून उपस्थित नगरसेवकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व नगरसेवकांना 'सबको मिलुंगा' असा खास शैलीत त्यांच्याशी संवाद साधला. आजचा मोदींचा दौरा हा पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निवडणुकांसाठी महत्वाचा ठरणारा आहे आणि अशातच मोदींनी चक्क नगरसेवकांशी संवाद साधल्याने याची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे.

हे देखील पहा -

दरम्यान आज मोदींच्या या दौऱ्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 9300 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर

Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

Pakistan Airstrike: पाकिस्तानकडून मध्यरात्री अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक, ३७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT