Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

चालत्या लोकलमधून मोबाईल चोरी; सराईत चोराला अटक

रेल्वे पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग करत सराईत चोराला अटक केली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण  - लोकलच्या फेऱ्या नियमित सुरू होताच चोरट्यांनी पुन्हा प्रवाशांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास बदलापूर कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करून त्यांच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी फलाटावर पाठलाग करत पकडले असून त्याच्याकडून 2 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. हर्ष पदमसिंग थापा 19 वर्षे असे आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर परिसरातील रहिवासी आहे.

हे देखील पाहा -

फुलांचे व्यापारी असलेले 50 वर्षीय रविंद्र जाधव हे पत्नी सोबत 19 मे रोजी रात्री 12.15 वाजताच्या कर्जत सीएसटीएम लोकलने बदलापूर कडून मुंबईच्या दिशेने लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होते. लोकल उल्हासनगर स्थानकात थांबताच हर्ष थापा हा चोरटा रविंद्र जाधव बसलेल्या सीट समोर उभा राहिला आणि लोकल सुरू होताच त्याने क्षणात रविंद्र यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. मात्र आरोपी मोबाईल खेचताच रविंद्रच्या पत्निने पाहिले व तिने आरडाओरडा सुरू केला.

रविंद्र यांनी सुद्धा त्याच्या मागे चालत्या लोकल मधून उडी मारून चोर चोर करत पाठलाग सुरू केला हे पाहून रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी फलाटावर धाव घेत चोरट्याचा पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत त्याच्याकडे चोरी केलेल्या मोबाईल सह आणखी एक मोबाईल सापडला असून पोलिसांनी हे दोन्ही मोबाईल जप्त करत चोरट्याला अटक केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT