मुबंई : माणुसकीला काळिंबा फासून निघ्रुन अत्याचार करून राक्षसी पध्दतीने बलात्कार करणाऱ्या आरोपींचे Rapist व्यावसायिक नैतिकता व सामाजिक बांधिलकीचे भान लक्षात घेता वकीलांनी वकीलपत्र न घेण्याबाबत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा (Bar Council of Maharashtra and Goa) च्या अध्यक्षांना मनसे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रिटा सुरेश गुप्ता यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे. हे पत्र मनसेच्या अधिकृत (MNS Adhikrut Twitter) ट्विटर वरती प्रसिध्द करण्यात आलं आहे. (MNS's request to the Bar Council not to take the lawyer's letter of the rapist)
त्यांनी या पत्रामध्ये राज्यात झालेल्या बलात्कारांचा तपशील देखील दिला आहे. 'राज्याची राजधानी मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवली Dombivli मध्ये संतापजनक घटना घडली या घटनेने सर्व हद्द पार केल्या. एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 29 नराधमांनी सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली, तसेच एका साडे तेरा वर्षांच्या मुलीवर 14 लोकांनी बलात्कार केला, सहा वर्षांच्या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार झाला. असेच पुण्यात तीन तर मुंबई मधील साकीनाका Sakinaka येथे तर महिलेवर बलात्कारानंतर तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अत्यंत क्रुर आणि अमानवीय प्रकार समोर आला आहे अशा अनेक घटनांची आठवण त्यांनी या पत्राद्वारे करुण दिली आहे.
हे देखील पहा -
राज्यात महिलांसाठी सुरक्षित आहे का?
"महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे का?,' राक्षसी अत्याचार आणि बलात्कारांच्या प्रकरणांमधून कुठले पुरोगामित्व सिद्ध होते? महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित आहे का? यासारखे अनेक प्रश्न महिलांना भेडसावत आहेत. भारताच्या घटनेत नमूद असलेली तत्त्वे शाबूत ठेवण्याचे काम भारतातील लोकांनाच करावं लागणार आहे. तसेच आपण ही जबाबदारी सक्षम पार पाडू शकता असा आमचा ठाम विश्वास आहे" असंही या पत्रामध्ये नमुद करण्यात आलं आहे.
शिक्षा काय करायची न्यायालय Court ठरवतं, पण बलात्कारच्या प्रकरणातील सर्व नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा The death penalty व्हावी हि जनभावना लक्षात घेता तमाम भारतीयांच्या वतीने,पीडित कुटुंबियांना त्वरित न्याय मिळण्याच्या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या MNS वतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ह्यांस विनंती करते कि, व्यावसायिक नैतिकता व सामाजिक बांधिलकीचे भान लक्षात घेता वरील नमूद अथवा कोणत्याही बलात्कार प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र वकिलांनी न घेऊन अवघ्या जगा समोर एक आदर्श उभा करावा, हीच बलात्कारामुळे दुदैवी मृत्यमुखी पडलेल्या व बलात्कार पीडितांना आपणांसकडून खरी श्रद्धांजली ठरेल. अशा आशयाच पत्र रिटा गुप्ता यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या अध्यक्षांना दिलं आहे. यावेळी याप्रसंगी मनसे सरचिटणीस श्री. राजेंद्र शिरोडकर देखील उपस्थित होते.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.