MNS's No to Halal campaign failed Saam TV
मुंबई/पुणे

MNS: मनसेची 'No To Halal' मोहीम सुरू होण्याआधीच फुस्स; बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले

MNS's No to Halal campaign failed: मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी काल, शनिवारी पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'नो टू हलाल' (Halal Meat) ही मोहीम हाती घेतल्याची बातमी कालच आली होती. इस्लामिक पद्धतीने प्राण्याची होणारी कत्तल यावर आवाज उठवत मनसेने (MNS) 'नो टू हलाल' ही मोहीम हाती घेतलेली होती. मात्र मनसेची ही मोहीम सुरू होण्याआधीच फुस्स झाली आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी नो टू हलाल या मोहिमेबाबत स्पष्टपणे बोलत 'ही मनसेची अधिकृत भूमिका नाही' असं स्पष्ट केलं आहे. (MNS No to Halal Movement Failed)

हे देखील पाहा -

हलाल अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. त्यामुळे 'नो टू हलाल' या मोहिमेत सामील होण्याचे मनसेकडून आवाहनही करण्यात आले होते. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी काल, शनिवारी पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र किल्लेदार यांनी 'नो टु हलाल' मीट प्रकरणी मांडलेली भूमिका ही अधिकृत नसल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.

याप्रकरणी मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, आमच्या एका कार्यकर्त्याने ती मागणी केली आहे, मात्र ती पक्षाची भूमिका नाही. 'से नो टू हलाल' ही पक्षाची भूमिका नाही. जोपर्यंत पक्षप्रमुख एखादी मागणी करत नाही तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होत नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे उचित नाही. एखादा कार्यकर्ता कुठंतरी पत्र देतो आणि त्यावर आम्ही भाष्य करणे हे उचित नाही असं बाळा नांदगावकर म्हणाले, त्यामुळे मनसेची नो टू हलाल मोहीम ही सुरु होण्याआधीच फुस्स झाल्याचं बोललं जातंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT