मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भाजपमध्ये अल्पसंख्याक सेल का? व्होट जिहादच्या आरोपावर मनसेचा खोचक सवाल

Maharashtra Political News : राज ठाकरे यांनी आयोगावर टीका कली. त्यानंतर भाजपने विरोधकांवर जोरदार टीका केली. त्याचं उत्तर आता मनसेने दिलं आहे.

Vishal Gangurde

बोगस मतदारांवरील आरोपांदरम्यान निवडणुका घोषित

निवडणूक आयोगावर मनसेचा निशाणा

आशिष शेलार यांच्या वोट जिहाद च्या मुद्द्याला मनसेकडून जोरदार उत्तर

सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या निवडणूक आयोगाला रॉकस्टार म्हटले पाहिजे, हेमंतकुमार कांबळे यांची खोचक टीका

संजय गडदे, साम टीव्ही

मतदारयाद्यांमध्ये दुरुस्ती न करताच निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र निवडणूक आयोगाच्या या घोळावर आता मनसेने आक्षेप घेत निशाणा साधला आहे. यावेळी मनसेने भाजप आणि आयोगावर देखील टीका केली.

दुबार मतदारांच्या प्रश्नावरून निवडणूक आयोगाने दोन स्टार तीन स्टार देण्याचा विचार मांडला आहे. मात्र यावरूनच आता मनसेने निवडणूक आयोगावर निशाणा साधताना म्हटले आहे की, निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारा आयोग असून त्यालाच आता 'रॉकस्टार' दिला गेला पाहिजे'.

व्होट जिहादच्या आशिष शेलार यांच्या आरोपावर मनसे प्रवक्ते हेमंतकुमार कांबळे म्हटले की, भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. बोगस मतदारांना त्यांनी व्होट जिहाद म्हटले, आम्ही बोगस मतदार म्हटलं. त्यांनी बोगस मुस्लिम मतदार काढले म्हणजे बोगस मतदार आहेत, जसं अतिरेक्यांना जात नसते. तसं बोगस मतदाराला जात धर्म नसतो, असं आमचं म्हणणे आहे'.

'भाजपला जर मुस्लिमांचा एवढा तितकारा असेल तर त्यांचा अल्पसंख्यांक सेल का आहे? महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाला एका विशिष्ट समाजाकडून बिल्डरकडून घर नाकारले जाते, तो व्होट जिहाद नाही का? तुमचं जे ब्रीद वाक्य आहे जस्टिस फॉर ऑल हे चुकीचं ठरत आहे, असे ते म्हणाले.

गुजराती राजस्थानी मारवाडी लोकांसाठी तुम्ही उतरत असाल तर हे तुष्टीकरण नाही का मुंबई महाराष्ट्र सोडून असे कोणत्या राज्यात तुमचे उत्तर भारतीय मोर्चा आहे का? गुजराती सेल इतर कोणत्या राज्यात आहे का? राजस्थान प्रकोष्ठ इतर कोणत्या राज्यात आहेत? महाराष्ट्र सोडून तुम्ही त्यांना कुठे प्रतिनिधित्व दिले का, असा प्रश्न उपस्थित करून मनसेने आशिष शेलार आणि भाजपला सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT