MNS Saam TV
मुंबई/पुणे

MNS Tweet on ST : 'निर्णय वेगवान, गतिमान सरकार' म्हणणारं 'त्रिकुट' करतंय काय? एसटीचा VIDEO शेअर करत मनसेची टीका

Viral Video : एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था या अपघातातून पुन्हा एकदा समोर आली आहे.

प्रविण वाकचौरे

सुशील थोरात

Ahmedngar News :

अहमदनगरमध्ये एसटी बसचा एक विचित्र अपघात समोर आला आहे. भरधाव वेगात असणाऱ्या एसटी बसचं चाक निखळून पडल्याने अपघात झाला. या घटनेतून एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

पुण्याहून रावेरकडे ही बस निघाली असताना नगर-पुणे महामार्गावरील चास शिवारात ही घटना घडली. अपघात घडला त्यावेळी या बसमध्ये 55 ते 60 प्रवासी प्रवास करत होते. चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवत बस जागेवर थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. (Viral VIdeo)

मनसेची टीका

या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सडकून टीका केली. मनसेने आपल्या अधिकृत X (जुनं ट्विटर) अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं की, 'नगरमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसचं चाक निखळलं, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.'  (Latest Marathi News)

'७५ वर्ष जुनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशी आचके का देत आहे? 'निर्णय वेगवान, गतिमान सरकार' म्हणत मिरवणारे 'त्रिकुट' काय करतंय? एसटीचंच नव्हे तर ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं एक-एक चाक निखळतंय. परिवहन मंत्री महोदय वेळीच लक्ष द्या!', असं ट्वीट मनसेने केलं आहे.

तिकीट काढून गळक्या बसमध्ये बसायचं का?

एकीकडे राज्य सरकार एसटीची तिकिटं आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देत असताना दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळातील बसगाड्यांची अवस्था बिकट असल्याचं वास्तव आमदार सत्यजीत तांबे यांनी ट्विटद्वारे मांडलं. आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे तिकीट बुक करून एसटी महामंडळाच्या गळक्या बसमध्ये बसायचे का? असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Highest egg consumption: कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात?

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Basundi Recipe: सणासुदीला घरी बनवा गोड बासुंदी; सोपी रेसिपी वाचा

Nashik Flood : गोदावरीला पूर, अनेक वाहनं अडकली | VIDEO

SCROLL FOR NEXT