Shahabaz Panjabi Saam TV
मुंबई/पुणे

मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष कालच्या सभेने नाराज; शिवसेनेत करणार प्रवेश

मनसेचे शहर उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी (Shahabaz Panjabi) यांनी मोठी घोषणा केली आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: मनसेचे शहर उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी (Shahabaj Panjabi) यांनी मोठी घोषणा केली आहे. ते पुण्यातील कोंढवा भागातील मशिदींसमोर मनसे कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा लाऊ देणार नाहीत असा निर्णय त्यांनी घेतला आहे. राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबात भुमिका घेतल्यानंतर शाहबाज पंजाबी यांनी मनसेचा राजीनामा दिला होता.

पुण्यातील मनसेच्या (Pune Manase) पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला होता. परंतु काल राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेलाही ते गेले होते. परंतु कालच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा मशिदींसमोर भोंगे लावण्याचा आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिल्यानंतर शाहबाज पंजाबी यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आठ तारखेला ते औरंगाबादमधे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयाने राज्यातील मुस्लीम समाज नाराज झाला. मनसेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी याअगोदरही मनसेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरेंनी आपल्या उत्तरसभेतही आपल्या भोंग्यांवरच्या भूमिकेवर ठाम राहिले. मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे ही राज ठाकरेंच्या या भूमिकेवर नाराज होते, त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यानंतर त्यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागले होते. आता काल सभेमध्ये राज ठाकरेंनी ४ तारखेपासून शांत बसणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज ठाकरेंची भूमिका काय असते आणि त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT