- अभिजित देशमुख
आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्याचा कल्याण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने निषेध नाेंदविण्यात आला. दरम्यान मुंबईतील अंधेरी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर श्रीरामांबाबतच्या वक्तव्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)
प्रभु श्रीरामांबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात विविध हिंदुत्ववादी संघटना आजही (शनिवार) आव्हाडांचा निषेध नाेंदवित आहेत. कल्याण येथे मनसे कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. मनसेचे पदाधिकारी अंकूश राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्याण पूर्वेतील काही सरकारी शौचालयात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो लावला.
येत्या 22 तारखेला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांना दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी साम टीव्हीशी बाेलताना उपस्थित केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जो कोणी श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करेल त्यांना मनसे धडा शिकवेल असा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.