Raj Thackeray on Pune By Election 2023 Saam Tv
मुंबई/पुणे

Pune By Election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; राज ठाकरेंचे आवाहन प्रमुख पक्षांनी फेटाळले, आता पुढे काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हेच आवाहन प्रमुख राजकीय पक्षांनी फेटाळले आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune By Election Update : पुण्यात दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. मनसेने या निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच या निवडणुका बिनविरोध करा, असे आवाहन केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हेच आवाहन प्रमुख राजकीय पक्षांनी फेटाळले आहे. (Latest Marathi News)

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांमधून मनसेने माघार घेतली. राज ठाकरे यांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुका बिनविरोध करा, असं आवाहन प्रमुख राजकीय पक्षांना केलं होतं.

मात्र, कार्यकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आवाहन प्रमुख पक्षांनी फेटाळल्याचे समोर आले आहे. या सर्व राजकीय घडमोडीवर १० फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची आता भूमिका काय राहील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मनसेने स्थानिक पदाधिकारी आग्रही असतानाही घेतली माघार

कसबा मतदारसंघात मनसेची (MNS) चांगली पकड आहे. त्यामुळे कसबा निवडणूक लढावी असा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रह धरल्याने मनसे या निवडणुकीत सहभाग घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

कसबा मतदारसंघात आतापर्यंत मनसेला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवली तर मनसे फायदा होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन मनसे कसबा विधानसभा जिंकू शकते असा विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला होता.

कसबा निवडणूक लढण्यासाठी गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर, निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे अशी इच्छुकांची मोठी लिस्ट होती. मात्र, राज ठाकरे यांनी पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं आहे. मात्र, प्रमुख पक्षांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे आवाहन फेटाळल्याने ते १० फेब्रुवारी रोजी भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा राजीनामा

Maharashtra News Live Update: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख रुपयांचा अपहार

Pakistan Blast : पोलीस चौकीवरील हल्ल्यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या; जंगलात आढळला जळालेला मृतदेह, चाहत्यांमध्ये खळबळ

Helmet Expiry Date Checking Tips: हेल्मेट किती वर्षे वापरावे? 'हे' आहेत हेल्मेट बदलण्याचे 3 महत्त्वाचे संकेत; आजच तपासा

SCROLL FOR NEXT