MNS SAAM TV
मुंबई/पुणे

Pune MNS : मनसेत अंतर्गत वाद; वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा, स्वत: सांगितलं कारण...

पक्षाच्या अंतर्गत वादामुळे वसंत मोरे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> रुपाली बडवे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहे. राज्याच विविध ठिकाणी दौरे करत आहेत, कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. मनसेचा आज मुंबईत मेळावा देखील पार पडत आहे. मात्र एकीकडे कार्यकर्त्यांनी नवी उर्जा देण्याचं काम राज ठाकरे करत असताना पुण्यात मात्र वेगळं चित्र आहे. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा समोर आली आहे.

वसंत मोठे पुण्यातील मनसेचं मोठं नाव. वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा समोर आली आहे. पक्षाच्या अंतर्गत वादामुळे वसंत मोरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील मनसेच्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना बोलू दिलं नसल्याची चर्चा आहे. याबाबत वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षकाची जबाबदारी कायम आहे. मात्र, काम पुणे कार्यक्षेत्रात करा असा आदेश दिल्याची माहिती देखील समोर येत आहे.

वसंत मोरेंना स्थानिक पदाधिकारी डावलत आहेत, हे देखील वसंत मोरेंच्या नाराजीचं कारण आहे. पुण्यात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे वाद सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यातील मनसेच्या या अंतर्गत वादावर राज ठाकरे किंवा इतर वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

मी नाराज नाही, तर माझे कार्यकर्ते नाराज आहेत. मेळाव्याला मला बोलवलं मात्र बोलू दिलं नाही. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्ते मला विचारत होते, तुम्ही का बोलले नाही. मी त्यांनी सांगितलं मला माहिती नाही वरिष्ठांना विचारा. अशावेळी विचारतात की सर्व सभा संपायला आली. तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो, असं कार्यकर्ते म्हणत होते. हीच परिस्थिती माझ्या मतदारसंघातील मेळाव्यात झाली होती. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावीत असं का होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT