MNS Chief Raj Thackeray's visit to Ayodhya postponed? Raj Thackeray's Ayodhya Visit, Raj Thackeray News, MNS News Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित? लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Raj Thackeray's visit to Ayodhya postponed? उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांचा राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध होता.

सूरज सावंत

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या ५ जूनला अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला जाणार होते. मात्र आता राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज ठाकरेच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यामुळे राज ठाकरेंचा हा दौरा स्थगित झाला आहे. मनसेकडून (MNS) अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली गेलेली नाही, मात्र अशा चर्चा सुरू आहेत. (MNS Chief Raj Thackeray's visit to Ayodhya postponed?)

हे देखील पाहा -

...यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या तब्येतीचं कारण सध्या पुढे येत आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांचा राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध होता. त्याचप्रमाणे ज्ञानव्यापीचा मुद्दा देखील उत्तर प्रदेशात गाजतोय. अशात राज ठाकरेंच्या सभेमुळे पोलीस यंत्रणेवर ताण येऊ शकतो आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनसेने हा दौरा स्थगित केल्याचं बोललं जातंय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची नवी तारिख अद्याप मनसेने जाहीर केलेली नाही. (Raj Thackeray News)

दरम्यान राज ठाकरेंचा उद्या (२१ मे, शनिवारी) होणारी पुण्यातली सभाही रद्द झाली आहे. नदीपात्रातील सभा रद्द झाल्यावर आता सभेऐवजी मनसेकडून मेळावा घेण्यात येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीत पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT