Raj Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? खास शैलीत राज ठाकरेंनी सांगून टाकलं

Raj Thackeray News: उद्या पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार, पत्रकाराच्या या प्रश्नावर राज ठाकरेंनी खास शैलीत उत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राज्यातील या राजकारणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय नेत्यांना खडेबोल सुनावले आहे. त्यात उद्या पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार, पत्रकाराच्या या प्रश्नावर राज ठाकरेंनी खास शैलीत उत्तर दिलं. (Latest Marathi News)

राज्याच्या राजकारणात उलपालथ झाल्यानंतर मनसेने संतप्त महाराष्ट्राची मानवी साखळी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहीमेसाठी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे. राज्यातील राजकारणी एकमेकांशी भांडतात, नंतर एकत्र येतात. आता जे महाराष्ट्रात जे झालं, ते झालं. आता काहीजण तडजोड करत आहेत. त्याची चिंता नाही. पण उद्याच्या पिढीसाठी यांनी ताटात काय वाढून ठेवलंय ते महत्त्वाचं आहे'.

'तुम्ही कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहात? भावी पिढीला हेच राजकारण वाटलं तर महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल. याचा विचार कोणी करत आहे का? कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, सत्ता आणि स्वार्थाचं राजकारण करायचं, हे फार घाणेरडं राजकारण आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर उद्या पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार, असा प्रश्न पत्रकाराने केल्यानंतर राज ठाकरे यांनी काही नाही असं त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT