Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: मुंबईतील वाढत्या झोपडपट्टीवर राज ठाकरेंनी ठेवलं बोट; म्हणाले...

Raj Thackeray News: या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या झोपडपट्टीवर भाष्य केलं.

Vishal Gangurde

Raj Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे रस्ते, साधन सुविधा व आस्थापना विभागाचा आज पाचवा वर्धापन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या झोपडपट्टीवर भाष्य केलं. (Latest Marath News)

राज ठाकरे म्हणाले, 'पक्षात आपण पक्षात अनेक विभाग तयार केले आहेत. सदर विभाग वेगवेगळ्या विषयावर काम करतात. पक्षात रस्ते, साधन सुविधा आणि आस्थापना विभाग सुरु आहे. समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना राजकीय पक्षांनी हात घालणं गरजेचं आहे'.

'अग्निशमन दलाचे अधिकारी येथे आले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत काम करतात. त्यांनाही बायका पोर असतात. माझा नवरा बाहेर गेलाय, कुठे आग लागेल, काय होईल माहिती नसतं. यांच्याबद्दल आपल्याला प्रेम भावना असायला हव्यात. मागच्या वेळेस कसाब आला. तेव्हा अधिकारी गेले, तेव्हा कोणाला माहिती होतं का जाणार आहेत, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

'आपत्कालीन म्हणजे केवळ नाला तुंबण नव्हे. मी रायगडला गेलो होतो. तेव्हा काहीजण भेटले. तेव्हा मला ते म्हटले जेव्हा आमच्याकडे पूर आला. तेव्हा केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली होती, बर झालं आता तुम्ही आलात आभार मानतो, असे ठाकरे म्हणाले.

'मुंबईत नाले इकडे तुंबत आहेत. कोणामुळे हे पाहा. बाहेरून आलेले त्या ठिकाणी बस्तान बांधत आहेत. मुंबईतील किती नद्या मारून टाकल्या. मुंबईत मिठी नदी आहे. तिला कोण मिठी मारतंय? तिलाही मिठ्या मारल्या आहेत. मुंबईत पाईपलाईनच्या बाजूला लोक वस्त्या बांधत आहेत. कोणाचं लक्ष नाही. आमदाराचं लक्ष नाही. कोणाचं लक्ष नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी मुंबईतील वाढत्या झोपडपट्टीवर बोट ठेवलं .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT