Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: सध्या मतदारांना काहीच किंमत नाही; राज ठाकरेंना असं का वाटतंय?

Marathi Rajbhasha Gaurav Din: मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपलं परखड मत व्यक्त केलं.

साम टिव्ही ब्युरो

Panvel News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मतदारांना काही किंमत आहे, असं मला वाटत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठी राज भाषा गौरव दिनानिमित्त पनवेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत पार पडली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपलं परखड मत व्यक्त केलं.

नागरिकांच्या हक्कांबद्दल आणि सामाजिक प्रश्नांबद्दल राज ठाकरे यांना विचारलं असता, त्यांनी म्हटलं की, आताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मतदारांना काही वॅल्यू आहे असं मला वाटतच नाही.तुम्ही फक्त नोकर आहात यांचे, मतदान करा आणि मोकळे व्हा. बाकी आम्ही काय नाचायचं नाचू. आज याच्याबरोबर फुगडी तर उद्या त्याच्याबरोबर झिम्मा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. (Political News)

सामना वर्तमानपत्र वाचता का?

राज ठाकरे सामना वाचतात का असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं. सामना वर्तमानपत्र घरी येतं पण वाचत नाही. हल्ली वर्तमानपत्रात तशा बातम्या पण फार नसतात. चॅनल तर बघवतच नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

मराठी माणसांनी वाचलं पाहिजे, साप्ताहिक जपली पाहिजेत. युरोपमध्ये लोकांनी वाचन थांबवलं नाही. वाचलं पाहिजे अन्यथा विचारांना तोकडेपणा येतो. भाषा ही तुमची ओळख असते, असा मोलाचा सल्लाही राज ठाकरेंनी नागरिकांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT