rAj thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: खासगी वाहनांना टोल लावू नका, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी, राज्य सरकार काय भूमिका घेणार?

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Vishal Gangurde

Raj Thackeray News:

राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध टोलच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलमधून खासगी वाहनांना वगळावं, अशी मागणी शिंदे सरकारकडे केली. 'जनता रोड टॅक्स देते, मग टोलचा भार कशाला, असा रोखठोक सवाल देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. (Latest Marathi News)

टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांचा भाडीमार शिंदे सरकारला केला. टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का आहे? तसेच महिलांसाठी शौचालय का नाही, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. रस्त्यांच्या अवस्थेवरही राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला.

टोल माफी होणार का?

राज ठाकरे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरटीओ विभागाच्या ठाणे पासिंग असलेल्या MH 04 क्रमांकाच्या वाहनांना टोल माफ करण्याचा विचार सुरु आहे. याबाबत लवकर निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

बैठकीत पोलिसांच्या घरांबाबत काय चर्चा झाली?

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत अजून एका महत्वाचा मुद्द्यावर चर्चा झाली. ३३ अ योजनेअंतर्गत पूर्ण राज्यभरातील पोलिसांना हक्काची घरं मिळण्याबाबत चर्चा झाली. पोलिसांना १५ हजार घरे देण्याची मागणी ठाकरेंनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. आज घेतलेल्या बैठकीनंतर त्यांनी उद्या सकाळी ८ वाजता संबधित लोकांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर मी सकाळी १० वाजता प्रसारमाध्यमांशी बोलेल. पोलिसांच्या घरांचाही प्रश्न चर्चेत आला, त्याच्यावरही उद्याच बोलेन'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकोटमध्ये भाजपकडून पैसे वाटप, विरोधकांचा आरोप

Suraj Chavan : येळकोट येळकोट जय मल्हार!बायकोला उचलून सूरज चव्हाण चढला जेजुरी गड, पाहा PHOTOS

Local Body Election : सर्वात मोठी बातमी! उद्या होणारी मतमोजणी रद्द, आता २१ डिसेंबरला उमेदवाराचे भवितव्य समजणार, हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Live News Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त; चांदीचे दर जैसे थे, १ तोळं सोन्याचा भाव किती?

SCROLL FOR NEXT