Dahihandi | बंदीचे नियम झुगारत मनसेने फोडली प्रतीकात्मक दहीहंडी! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Dahihandi | बंदीचे नियम झुगारत मनसेने फोडली प्रतीकात्मक दहीहंडी!

राज्यात दहीहंडी उत्सवावर बंदी घालण्यात आली असतानाही मनसेनं आज बदलापुरात प्रतिकात्मक दहीहंडी फोडत राज्य सरकारचा निषेध केला.

अजय दुधाणे

बदलापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे दहीहंडी सारख्या गर्दी होणाऱ्या उत्सवावर राज्य सरकारने यंदाही बंदी कायम ठेवली आहे. मात्र, या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला आहे. फक्त हिंदूंच्याच सणांवर नियम आणि अटी का लादले जातात? असा सवाल मनसेने केला आहे.

हे देखील पहा -

यानंतर बदलापूरमध्ये मनसेनं राज्य सरकारचा निषेध म्हणून प्रतिकात्मक दहीहंडी फोडली. एकीकडे राज्यात मोर्चे, यात्रा निघत असताना त्यामध्ये कोरोना होत नाही. मग फक्त दहीहंडीतच कोरोना होतो का? असा सवाल यावेळी मनसेने विचारला.

दरम्यान बदलापूर शहरात मनसेने दहीहंडी फोडणारच, अशी घोषणा केल्यानंतर सकाळपासून बदलापूर शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र तरीही काही पदाधिकाऱ्यांनी गनिमीकावा करत बदलापुरात दहीहंडी फोडली असून राज्य सरकारचा निषेध केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

शिक्षक बदली घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ थांबवली

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

धक्कादायक! खड्ड्यांमुळे रिक्षातच प्रसूती; भिवंडीत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

SCROLL FOR NEXT