मराठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या यूपीच्या चौघांना मनसेचा चोप  Saam Tv News
मुंबई/पुणे

मराठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या यूपीच्या चौघांना मनसेचा चोप

''चित्रपटात लीड रोल देतो, पण चित्रपटाच्या निर्मात्यांना खूश करावं लागेल'' असं म्हणत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या चौघांना मनसेनं ठाण्यात चोप दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

''चित्रपटात मुख्य भुमिका देतो पण चौघांसोबत रात्र घालवावी लागेल'' अशी मागणी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चार जणांना मनसेने ठाण्याच्या घोडबंदर येथे चांगलाच चोप दिला आहे. एका नवोदित मराठी अभिनेत्रीकडे ही संतापजनक मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचत सिनेस्टाईलने या चौघांचा पाठलाग करत ठाण्यातील घोडबंदर येथे एका फार्महाऊस जवळ यांना गाठले आणि चोप दिला. (MNS beats casting directors from UP for casting couch with Marathi actress)

एका नवोदित मराठी अभिनेत्रीकडे उत्तर प्रदेशच्या चौघांनी चित्रपटात काम देतो असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली. तेव्हा या मुलीने ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना सविस्तर सांगितली. तेव्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सापळा रचत त्यांचा बराच काळ गाडीतून पाठलाग केला. शेवटी योग्य संधी साधत या चौघांना ठाण्यातील घोडबंदर येथील फार्महाऊसवर रंगेहाथ गाठले आणि मनसैनिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला आहे. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी या चौघांची नावे असून त्यातील एक जण शिवसेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे. सोबतच या चौघांकडे कट्टे देखील सापडले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे म्हणाले की, ही अशी माणसं उत्तर प्रदेश, बिहारमधून येतात आणि आपल्या मुलींना खराब करण्यासाठी त्यांना नको नको त्या चित्रपटांमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं जातं. मात्र या मुलीची दाद दिली पाहिजे कारण तिने यांच्याविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला. हे असे नराधम लोकांसमोर आले पाहिजेत. आज मी आवाज नाही उठवला तर हे लोक अशा किती महिलांवर आत्याचार करतील सांगता येत नाही. तिच्या या एका आवाजासाठी आम्ही इथे एकत्र येऊन या लोकांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधिन केल्याची माहिती राणे यांनी दिली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT