मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार - बाळा नांदगावकर 
मुंबई/पुणे

मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार - बाळा नांदगावकर

काही दिवसात एखादी गोड बातमी ऐकायला मिळू शकेल.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - येत्या काही दिवसात राज्यातील 15 महानगर पालिका आणि नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकणांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवथीर्थ बंगल्यावर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. दरम्यान, यावेळी आगामी काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे देखील पहा -

पुढे बाळा नांदगावकर म्हणले की, 6 डिसेंबरला पुण्यात पदाधिकारी बैठक पार पडणार आहे.14 डिसेंबरला मराठवाडा येथील पदाधिकाऱ्यांची बैठक असणार आहे. तर 16 डिसेंबरला पुणे येथे प.महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. कोकण पदाधिकाऱ्यांबाबत तारीख अजून ठरायची आहे. आमची आयोध्याला जायची तयारी झाली आहे पण ती तारीख अद्याप ठरायची आहे.

राज ठाकरे दौऱ्याला जाऊन आल्यावर नेतेमंडळी बैठका घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रची बैठक ही नाशिक नाहीतर जळगावला घेण्यात येणार आहे. मुंबईबाबत पण चर्चा झाली तिथे देखील बैठका होणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

परामबीर सिंग यांचा निर्णय राज्यसरकारकडे आहे आणि तो निर्णय झाला आहे. त्यांनी अविनाश जाधव यांच्याकडे 1 कोटींचा बॉण्ड मागितला होता. आता निलंबनाच्या स्वरूपात परामबीर सिंग त्यांना ते भोगावे लागत आहे. आतापर्यंत सगळ्या निवडणूक आम्ही एकला चलो रे भूमिकेतून घेतल्या. राज ठाकरे पुढे निर्णय घेतील. मात्र, काही दिवसात एखादी गोड बातमी ऐकायला मिळू शकेल. नांदगावकर यांच्या या वक्तव्यामुळे मनसे नेमके कोणत्या पक्षासोबत हात मिळवणी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: RSS च्या शताब्दी वर्षाचा समारोप रेशीमबाग मैदानावर विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाने होणार

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवरांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

SCROLL FOR NEXT